जागरूक महिला कार्यक्रम

1 खेडेगावातीलमहिलांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढावा .
2 मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीत त्या जागरुक व्हाव्यात .
3 वाचन संस्कृती वाढावी.
4 आपल्या गावातील प्रश्न स्वतः मांडून त्याची उत्तरे शोधावी.
5 आपल्या पाल्याची शिक्षणाची जबाबदारी जशी शाळेचे आहे तशीच आपली स्वतःची देखील आहे याची खेड्यातील महिलांना जाणीव व्हावी .
6 आपले गाव आपली जबाबदारी आहे आणि आपल्या घराप्रमाणेच आपण आपलं गाव देखील स्वच्छ व सुंदर ठेवलं पाहिजे ही जाणीव करून देणे.
7 संविधानाने आपल्याला ज्याप्रमाणे मूलभूत अधिकार दिले आहेत त्याप्रमाणेच मूलभूत कर्तव्य देखील सांगितलेली आहेत.
याची देखील जाणीव व्हावी.
म्हणून ,08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माय माती फाउंडेशन संचलित जागरूक महिला कार्यक्रम दरवर्षी गावातील सर्व स्तरातील शिक्षित अशिक्षित महिलांसाठी घेतला जातो याचे स्वरूप दरवर्षी वेगळे असते महिलांना याच्या माध्यमातून त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माय माती फाउंडेशन करीत आहे.
वकृत्व स्पर्धेचा विषय. / सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला
वेळ/ 3 मिनिट
यासाठी 32 महिलांनी सहभाग नोंदवला त्यापैकी पहिल्या तीन महिलांना सुमारे
1 प्रथम पारितोषिक 1000 रुपये रोख सौ संगीता दिनेश भालेराव .
2 द्वितीय पारितोषिक 750 रुपये रोख सौ दिपाली दिगंबर सपकाळे
3 तृतीय पारितोषिक 500 रुपये रोख रमाबाई भालेराव यांना देण्यात आले.
तर सहभागी सर्व महिलांना मेडल आणि सन्मानपत्र देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.
श्री. वामनगीर गोसावी
सौ . संगीता सपकाळे
सौ. काजल मंडोरे
सौ. ममता जैन
श्री. जयंत दादा
परीक्षक म्हणून लाभले.
धामणगाव चे सरपंच उपसरपंच तसेच कमिटी मेंबर्स व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
8 मार्च 2021 सोमवार



8 मार्च 2022 मंगळवार
प्रश्मंजुषा विशेष
माय माती फाऊंडेशन संचलित जागृक महिला कार्यक्रमाअंतर्गत अंतराष्ट्रीय महिला दिवस
8 मार्च 2022 रोजी साजरा करण्यात आला.
नेहमीप्रमाणेच आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत (आज सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खूप जोराचा पाऊस झाला आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेवर बरोबर पाच वाजता पाऊस थांबला तरीही कार्यक्रम घेण्यात आला. )
प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमाचं वेगळेपण जपत संपूर्ण कार्यक्रम ह्या वेळच्या वेगळेपणाने अगदी ठळकपणे उठून दिसावा अशाप्रकारे साजरा झाला.
दुपारी दोन ते चार दरम्यान रांगोळी स्पर्धा झाली त्यात 9 मुलींनी सहभाग नोंदवला.
10 महिलांनी आपले मत व्यक्त केले
त्यानंतर ( प्रश्नमंजुषा) हा सरप्राईज गेम घेण्यात आला या खेळात ज्यांनी ज्यांनी तीन प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीतअशा पाच विजेत्यांना एक एक साडी बक्षीस देण्यात आली आपल्या कार्यक्रमाला श्री कासार सर, सौ अमिता निकम मॅडम आणि अग्रवाल मॅडम अतिथी, वक्ते लाभले.
